Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा तहसील मध्ये महसूल दिन साजरा महसूल विभागातर्फे महसूल सप्ताहाचे आयोजन महसूल सप्ताहाचे शुभारंभ आमदार राजेश पाडवी हस्ते संपन्न उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

 तळोदा तहसील मध्ये महसूल दिन साजरा


महसूल विभागातर्फे महसूल सप्ताहाचे आयोजन


महसूल सप्ताहाचे शुभारंभ आमदार राजेश पाडवी हस्ते संपन्न 


उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

          तळोदा येथील तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा करण्यात आला. महसूल विभागातर्फे दि १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट  दरम्यान महसूल सप्ताह आयोजन करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ  व महसूल विभागात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या  प्रशस्तीपत्र देऊन गौरव आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. 

               कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी हे होते. याप्रसंगी तहसीलदार दीपक धिवरे, बीडीओ किरवे, महसूल नायब तहसीलदार विजय ससे,  निवासी नायब तहसीलदार निशा नाईक, गौरव वाणी, दीपक कलाल, विनोद माळी किरण सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

         प्रास्ताविक महसूल अधिकारी वर्षा माळस्कर यांनी केले. याप्रसंगी महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या सन्मान करण्यात आला. 


                तळोदा तहसील कार्यालयात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या निवासी नायब तहसीलदार निशा नाईक, बोरद मंडळ अधिकारी मिथुन राठोड, सहाय्यक महसूल अधिकारी वासुदेव धनगर, महसूल सहाय्यक विद्या बंबाळे, ग्राम महसूल अधिकारी  योगेश गावित, प्रतापपुर ग्राम महसूल अधिकारी  अविनाश गावित, शिपाई बाबुराव काळे, महसूल सेवक मोहनसिंग ठाकरे, खरवड पोलीस पाटीलदीपक भिल, आदींसह क्रीडा स्पर्धात यश  संपादन करणारे अविनाश गावित यांचा प्रशस्तीपत्र आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते प्रदान करून गौरव केला.

तत्कालीन माजी आमदार कै. अर्जुनसिंग वळवी यांच्या कुटूंबियांचा सन्मान पत्र देऊन गौरव केला.

शिधा पत्रिका वाटप, उत्पंनाचे दाखले, मयाताचा वारस लावत जिवंत सातबारा वाटप, श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप करण्यात आले. यावेळी राजेश्री पाडवी, भरत गावित यांनी मनोगत व्यक्त केले.

           याप्रसंगी आमदार राजेश पाडवी म्हणाले की महसूल विभागाचा अधिकारी व  कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात. महसूल विभाग राज्य शासनाचा एक कणा आहे. जनतेच्या समस्या,प्रश्न शासनाचा योजना प्रामाणिक, पारदर्शक पणे राबविण्यात येतो. तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रत्येक कार्य करीत प्रभावी पणे काम करतात  काम करता अनेक अडचणी येतात त्यातून मार्ग काढत काम विभागाचे आहे.  जागृततेने जबाबदारी ने प्रभावी काम करणारे अधिकारी कर्मचारी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चे कौतुक केले.

      तहसीलदार दीपक धिवरे यांनी महसूल वर्षाचा प्रारंभ होतो. शासनाने  समन्वयाचा मोठी जबाबदारी दिली आहे.  कामकाजाचे नियोजन करून ती जबाबदारीने काम करावे असे आवाहन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तळोदा मंडळ अधिकारी तुषार साळुंखे यांनी केले.

Post a Comment

0 Comments