रांझणी आश्रमशाळेत बी एज्युकेटे मुव्हमेंट संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा
स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी संस्थेने घेतले दत्तक
तळोदा तालुक्यातील रांझनी येथील विद्यावर्धिनी आश्रमशाळेत बी एज्युकेटेड मुव्हमेंट या संस्थेकडून विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्या होत्या. सामान्य ज्ञान स्पर्धेत पांच यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेण्यात आले व इतर विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
रांझणी आश्रम शाळेत या संस्थे च्यावतीने स्पर्धा घेण्यात आल्यात. इयत्ता नववीच्या सामान्य ज्ञान स्पर्धेतून पांच विद्यार्थी राहुल ईश्वर पाडवी, राहुल नवा भिल, मंगल कृष्णा पावरा, वंदना भंगड्या वसावे, पार्वती दिनकर पाडवी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी या संस्थेने दत्तक घेतले. त्यांना पुढील 15 महिने तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन देण्यात येणार असून 10 वी नंतर पुढील शिक्षणासाठी सुद्धा ते मदत करणार आहेत.
शाळेत दिवसभर विविध स्पर्धा घेण्यात आल्यात त्यात संगीत खुर्ची, लिंबू चमचा, फुगे फोडणे, बेडूक उडी पळणे, लंगडी स्पर्धा इ 1 ली ते इ 9वी च्या विद्यार्थ्यांन ची स्पर्धा घेऊन विजेत्याना बक्षीस देण्यात आले.
Be Educated Movement संस्थेकडून शाळेला भेट म्हणून बॅट, बॉल, व्हॉली बॉल, फुटबॉल, बॅडमिंटन भेट म्हणून देण्यात आले. यावेळी इ 1 ली च्या विद्यार्थ्यांना स्वछतेचे महत्त्व पटावे म्हणून टूथपेस्ट व टूथब्रश वाटप करण्यात आले.
यावेळी Be Educated Movement या संस्थेच्या वतीने फलेंद्र पटेल यांनी सर्व कामकाज पाहिले मुख्यध्यापक भाऊसाहेब कुवर, मनोज चिंचोले, रामकृष्ण शिंदे, भूषण येवले, महेश सैंदाने, धनंजय मराठे, दीपक मालपुरे, अजय कुंभार, पंकज नर्सिंगे, गणपत वळवी, राजेश पाडवी, जयेश मालपुरे, पूजा वसावे, मित्रवंदा पाठक, प्रकाश पाडवी, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन, समालोचन तसेच आभार प्रदर्शन महेश रामोळे यांनी केले.



Post a Comment
0 Comments