Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धो-2025; जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे शशांक काळे

 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धो-2025;

जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

शशांक काळे

       नंदुरबार, दिनांक 21 ऑगस्ट, 2025 (जिमाका) :

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-2025 आयोजित करण्यात आली असून  जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत आणि परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हास्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा समितीचे सदस्य सचिव शशांक काळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


दिनांक 27 ऑगस्ट, 2025 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील सर्वोत्कृष्ट पहिल्या 3 विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून प्रथम, द्वितीय व तृतीय  असे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.


बक्षिसे:

• प्रथम क्रमांक: रुपये 5 लाख आणि प्रमाणपत्र.

• द्वितीय क्रमांक: रुपये 2 लाख 50 हजार आणि प्रमाणपत्र.

• तृतीय क्रमांक: रुपये 1 लाख  आणि प्रमाणपत्र.

याव्यतिरिक्त, जिल्हास्तरीय निवड समितीने निवडलेल्या 44 मंडळांपैकी पहिल्या 3 विजेत्यांना वगळून उर्वरित 41 मंडळांना प्रत्येकी रुपये 25 हजाराचे चे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.


स्पर्धेची माहिती आणि अटी:

• धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत किंवा स्थानिक पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी घेतलेली गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

• स्पर्धेची सविस्तर माहिती आणि प्रवेश अर्ज http://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

• पूर्ण भरलेला अर्ज Mahotsav.plda@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावा.

• अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट, 2025 आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

• ज्या मंडळांनी मागील सलग दोन वर्षे राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पारितोषिक जिंकले आहे, अशी मंडळे या स्पर्धेसाठी पात्र नाहीत.

• समान गुण मिळाल्यास, ज्या मंडळाची स्थापना अधिक जुनी आहे त्याला प्राधान्य दिले जाईल.


निवड प्रक्रिया:

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विजेत्यांची यादी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर शासन निर्णयाद्वारे स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल. निवड समितीने घेतलेला निर्णय अंतिम असेल आणि त्यावर कोणताही आक्षेप घेता येणार नाही. निवड समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे या 4 जिल्ह्यांतून प्रत्येकी 3 आणि इतर जिल्ह्यांतून प्रत्येकी 1, अशा एकूण 44 शिफारस केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गुणांकन करून पहिल्या तीन विजेत्यांची निवड करेल.


Post a Comment

0 Comments