महसूल सप्ताह 2025 निमित्त तळोदा तालुक्यात पाणंद/शिव रस्ते खुले करण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम
तळोदा येथील तहसील कार्यालयातर्फे महसूल सप्ताह 2025 च्या निमित्ताने आज दिनांक 03 रोजी तळोदा तहसील कार्यालयामार्फत तळोदा तालुक्यातील तळोदा, बोरद प्रतपापुर, सोमावल या चारही महसूल मंडळ भागांतील विविध गावांमधील पाणंद व शिव रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश पाणंद व शिव रस्ते मोकळे करून सार्वजनिक वापरासाठी खुल्या करणे हा होता. अनेक ठिकाणी या रस्त्यांवर अतिक्रमण व अडथळ्यांमुळे सामान्य ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे हे रस्ते जागेवर ओळखून त्यांच्या कडेला दुतर्फा वृक्षारोपण करून रस्ता सीमा दर्शविण्यात आली, जेणेकरून भविष्यात अतिक्रमण रोखता येईल व रस्ते कायमस्वरूपी खुले राहतील.
या उपक्रमामध्ये संबंधित गावांचे सरपंच, ग्रामस्थ तसेच तहसील कार्यालय तळोदा येथील सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरण संरक्षण आणि ग्रामविकासात सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्टे:
गावातील पाणंद/शिव रस्ते मोकळे करणे
अतिक्रमण रोखणे
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण
ग्रामस्थांमध्ये जनजागृती




Post a Comment
0 Comments