Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अक्कलकुवा तालुक्यात एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल (EMRS) स्थापन करण्यास पुढाकार.

 अक्कलकुवा तालुक्यात एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल (EMRS) स्थापन करण्यास पुढाकार.

दिनांक 03 जुलै रोजी अक्कलकुवा तालुक्यातील मौजे गोटपाडा येथे एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल (EMRS) संदर्भात जनजागृती करण्यात आली. या अनुषंगाने तळोदा सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनय नवंदर (आयएएस)  व  अक्कलकुवा तहसीलदार  विनायक घुमरे,  यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांना या शाळेचे महत्त्व व फायदे समजावून सांगण्यात आले.


शाळेचा उद्देश:

सदर निवासी शाळा ही अनुसूचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या मान्यतेने स्थापन केली जाणारी उच्च प्रतीची शैक्षणिक सुविधा आहे. या शाळेचा मुख्य उद्देश दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व सर्वांगीण शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे.


शाळेची वैशिष्ट्ये:

⦁ निवासी व्यवस्था: विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व सुसज्ज निवासी सोयी

⦁ शैक्षणिक गुणवत्ता: CBSE अभ्यासक्रमासोबत डिजिटल शिक्षण सुविधा

⦁ क्रीडा व कौशल्य विकास: आधुनिक क्रीडांगण व व्यावसायिक प्रशिक्षण

⦁ संस्कृती संवर्धन: स्थानिक आदिवासी कला, परंपरा व भाषेचा विकास


ग्रामस्थ्यांचा सहभाग:-

या जनजागृती बैठकीला ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामसेवक व स्थानिक नागरिक उपस्थित होते. 


एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल केवळ शिक्षण संस्था नसून, ती आदिवासी समाजाच्या भविष्याची मजबूत पायाभरणी करणारी संकल्पना आहे. 

.

.

.

#एकलव्यशाळा #EMRSNandurbar #Akkalkuwa #TribalEducation #DigitalIndia #InclusiveEducation #TransformingTribalIndia #NandurbarForEducation

Post a Comment

0 Comments