तळोद्याचे प्राध्यापक डॉ. महेंद्र माळी यांच्या पुस्तकांचा दोन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेशामुळे सत्कार
तळोदा येथील वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील अभ्यासू व उपक्रमशील तथा सतत शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे प्राध्यापक डॉ. महेंद्र हिरालाल माळी यांच्या पुस्तकांचा समावेश दोन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्यात आल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आयोजित पुस्तक अनावरण व लेखन सोहळा अंतर्गत 'अन्न व तंत्रज्ञान' या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक विज्ञान आणि तंत्रज्ञान या विद्या शाखेसाठी राष्ट्रीय धोरण २०२० च्या सुधारीत अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.
पुस्तक प्रकाशन व लेखक, विद्यार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू प्रा विजय माहेश्वरी, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग शिक्षण मंत्रालय दिल्लीचे माजी सचिव प्रा मनिष जोशी, केंद्रीय हिंदी संस्थानचे निदेशक डॉ सुनील कुलकर्णी, माजी प्रभारी कुलगुरू प्रा सोपान इंगळे, उपस्थित होते.
प्रा. डॉ. महेंद्र माळी यांचे काॅलेज ट्रस्ट चे अध्यक्ष भरत माळी, तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सम्राट महाजन, सुनिल सूर्यवंशी, दिपक मराठे, महेंद्र सूर्यवंशी, किरण पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक निमेश सूर्यवंशी, अजित टवाळे यांनी अभिनंदन केले आहे.



Post a Comment
0 Comments