पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय 'मन की बात' तळोदा येथे आ. राजेश पाडवी यांच्या उपस्थित कार्यक्रम
तळोदा – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय कार्यक्रम 'मन की बात' तळोदा येथे उत्साहात ऐकण्यात आला. येथील अजय परदेशी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आमदार राजेश पाडवी यांनीही कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून 'मन की बात' कार्यक्रम ऐकला. यावेळी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रा. विलास डांमरे, योगेश मराठे, संजय वानखेडे, नितीन पाडवी, गुलाब जोहरी, प्रकाश शर्मा, संजय वानखेडे,कमल परदेशी, रमेश माळी शरद मराठे, तुषार जोहरी, चेतन ठाकरे आदि उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या या भागात देशाच्या विविध भागांतील सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कथा, पर्यावरण रक्षण, विद्यार्थ्यांचे प्रश्न, आणि तंत्रज्ञानाच्या नव्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्यांच्या संवादात युवकांना मार्गदर्शन आणि नागरिकांनी आपल्या कर्तव्यातून राष्ट्र उभारणीस कसे हातभार लावावा, याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमानंतर आमदार राजेश पाडवी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी पंतप्रधानांच्या संवादातून प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांनी गावपातळीवर सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

Post a Comment
0 Comments