नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हेड बॉय हेड गर्ल यांची डिजिटल इलेक्शनने प्रथमच निवड
तळोदा शहरात नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात पारंपारिक मतदान पद्धतीचा वापर न करता नवीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शालेय स्तरावर मतदान घेण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या ईव्हीएम मशीन हे कसे काम करते हे मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष डिजिटल वोटिंगचा अनुभव देण्यात आला.
या डिजिटल इलेक्शनची संकल्पना इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी गौरी प्रशांत शिंपी व तिच्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती योगिता शिंदे यांच्या मदतीने हे डिजिटल वोटिंग यशस्वीरित्या पार पडले.
या उपक्रमास मुख्याध्यापक पी.डी. शिंपी व उपमुख्याध्यापिका कल्याणी वडाळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष निखिल तूरखीया उपाध्यक्ष डी.एन महाले संचालिका सोनाबेन तुरखियां सचिव संजय पटेल संस्था समन्वय हर्षिल तुरखिया यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. गीतांजली पाटील, प्रतिभा बैसाणे, वर्षा मराठे, अक्षता बारी, बादल वळवी, सोनाली बांदेकर, रोहित यादव, जिजा पराडके, योगेश पाडवी, गणेश पाडवी, मोहन कुवर, ललिता पाडवी, इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. दिपाली पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.



Post a Comment
0 Comments