महादेव अवतरले पर्यावरण संवर्धनासाठी!
तुळाजा माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न
तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात शनिवारी वृक्षदिंडीच्या कार्यक्रम मुख्याध्यापक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्रीमती मीराताई रहसे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच संदीप खर्डे, विक्रम डूमकुल, सीताराम राहासे, दिलवर खर्डे, लक्ष्मण पवार, सामाजिक कार्यकर्ते सचिन राहासे, किशन खर्डे तसेच जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक भरत वळवी तेथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते. सुरवातीला प्रतिमा पूजन करून मान्यवरांचा विद्यार्थी यांनी शंकर पार्वती यांची वेशभूषेत त्यांचा हस्ते रोप देऊन सत्कार करण्यात आला. त्या नंतर दिंडीला सुरुवात करण्यात आली.
या वेळी गावात विद्यार्थांनी 'झाडे लावा झाडे जगवा' याविषयी घोषणा देत जनजागृती केली. गावातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन रॅलीचे स्वागत अति उत्साहात केले. शंकर-पार्वतीचे पूजन,आरती करून जनजागृती रॅलीत सहभाग नोंदवला.
या प्रसंगी सीताराम राहासे यांनी आपल्या मनोगतात झाडांचे महत्व विशद करून माहिती दिली.त्यांनी कोरोना काळात आपणास ऑक्सिजनची कमी कशामुळे झाली याचे उदाहरण देत मार्गदर्शन केले. आभार संदीप मोरे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी ढोडरे, संदीप मोरे, विलास मगरे, विलास पाडवी, तुकाराम भिल, सुदाम जांभोरे, राहुल साळुंखे, पंकज खेडकर,संतोष राठोड, मोहन वळवी, सुबोध जावरे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेन्द्र ढोडरे यांनी केले.





Post a Comment
0 Comments