Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

रांझणी येथे विद्यावर्धिनी आदिवासी निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळाची आषाढी एकादशी निमित्त आषाढी दिंडीचे आयोजन.



रांझणी येथे विद्यावर्धिनी आदिवासी निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळाची आषाढी एकादशी निमित्त आषाढी दिंडीचे आयोजन. 


रांझणी येथील विद्यावर्धिनी आदिवासी निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या  विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल -  रखुमाई तसेच वारकरी यांची वेशभूषा करून दिंडी विठ्ठल मंदिर परिसरात व गावात दिंडी काढून मंदीरात जाऊन श्री विठ्ठल -रखुमाई यांचे दर्शनाचा लाभ घेतला.

दिंडीचे मंदीरात उपस्थित ट्रस्ट व गावातील भक्तगण यांनी मोठ्या आनंदाने स्वागत केले. दिंडीतील विद्यार्थ्यांनी परिसरातील ग्रामस्थांना सुखसमृद्धी व भरभराटीचे दिवस येवो अशी प्रार्थना केली.दिंडीचे आयोजन श्री साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपूर चे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.शशिकांतजी वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळेचे माध्य.मुख्याध्यापक श्री.शालीग्राम वाणी व प्राथ.मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब कुवर, अधिक्षक श्री.प्रेमकुमार माळी यांनी केले.कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक श्री.भूषण येवले, श्री.रामकृष्ण शिंदे, श्री .मनोजकुमार चिंचोले श्री.महेश रामोळे, श्री.पंकज नरसिंगे, श्री.दिपक मालपुरे, श्री.धनंजय मराठे, श्री.राजेश पाडवी, श्री.गणपत वळवी, श्री.अजय कुंभार, श्रीमती.पूजा वसावे, श्रीमती.मित्रविंदा पाठक, श्रीमती .बोधीबाई वसावे,श्री.सैंदाणे, श्री.जाधव, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments