नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल येथे ओथं सेरेमनी उत्साहात साजरी
परेड व मार्जिनच्या सहाय्याने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व आगमन हे झाले. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून नेमसुशील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पा बागुल व श्रीमोती विभागाचे मुख्याध्यापक गणेश बेलेकर व नेमसुशील इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक पी.डी शिंपी व उपमुख्याध्यापिका कल्याणी वडाळकर हे लाभले. जसे मंत्रिमंडळात शपथविधी घेऊन कामाची सुरुवात करण्यात येते. तसेच आमच्या शाळेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन शपथविधी पार पडली. यातून आपल्या कामाप्रती प्रामाणिकपणा कर्तव्यदक्षता या सर्वांची जावी जाणीव त्यांना विविध पदांचा कारभार सोपवून देण्यात आला. हाऊस वाईस कॅप्टन ची देखील निवड करण्यात आली. भविष्यात देखील अशाच प्रकारे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंत्रिमंडळात आपले नाव लौकिक करावे असे अध्यक्षीय भाषणातून त्यांनी वक्तव्य व्यक्त केले. या या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष निखिल तूरखीया, उपाध्यक्ष डी एम महाले, संचालिका सोनाबेन तूरखीया, सचिव संजय पटेल, संस्था समन्वय हर्षिल तूरखीया यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. मुख्याध्यापक पी.डी.शिंपी व उपमुख्याध्यापिका कल्याणी वडाळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. दिपाली पाटील, प्रतिभा बैसाणे, गीतांजली पाटील, योगेश पाडवी, जिजा पराडके, योगिता शिंदे, वर्षा मराठे, ईश्वर चित्रकथी, गणेश पाडवी, ललिता पाडवी, दीपा पाडवी इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले इयत्ता दहावीचा विद्यार्थी महेंद्र गुलाब पवार व इयत्ता नववीची विद्यार्थिनी समीक्षा ललित पाटील या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Post a Comment
0 Comments