शेवंती कृष्णा ट्रस्टच्या मोराणे प्र.ल. येथे
विठ्ठल रुक्मिणी पालखी सोहळा संपन्न
धुळे- मोराणे (प्र.ल.) उपनगर येथे शेवंती प्रायमरी स्कूल व कृष्णा हायस्कूलच्या वतीने शनिवार, दिनांक 5 जुलै रोजी 'विठ्ठल रुक्मिणी पालखी सोहळा’ संपन्न झाला.
या सोहळ्यास शेवंती कृष्णा ट्रस्टचे अध्यक्ष-डॉ. एन. के. ठाकरे, खजिनदार पुष्पल ठाकरे व पाहुणे म्हणून डॉ.आशुतोष रमेश पाटील हे उपस्थित होते. वारकऱ्यांची वारी, विठू नामाचा गजर, टाळ-चिपळ्यांचा नाद यामुळे शाळेतील वातावरण भक्तिमय झाले होते. दिंडीमध्ये टाळकरी, वारकरी लेझीम खेळणारे विद्यार्थी, तुळस घेऊन असलेल्या विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला.काही विद्यार्थ्यांनी रिंगण, फुगडी यासारखे नृत्याचे अविष्कार सादर केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारीही उपस्थित होते. त्यांनीही या सर्व कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. विद्यार्थ्यांना,शिक्षकांना शिक्षकेतर सहकाऱ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला व या कार्यक्रमाची सांगता झाली..

Post a Comment
0 Comments