पशुचिकित्सा शिबिरातून पशुपालकांना दिलासा डाब व वाण्याविहीर दवाखान्यांचा उपक्रम यशस्वी
मोजे गोजराबारी व चिवलउतार, येथील मोफत पशु चिकित्सा शिबिर
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागांतील पशुपालकांसाठी आरोग्यदायी उपक्रम राबवताना पशुसंवर्धन विभागाने पुन्हा एकदा महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पशुवैद्यकीय दवाखाना डाब मार्फत मोजे गोजराबारी व चिवलउतार या गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत पशु चिकित्सा शिबिरांमध्ये विविध वैद्यकीय सेवा देण्यात आल्या.
शिबिरातील सेवा व उपचारात गो व शेळी वर्गीय प्राण्यांचे लसीकरण, जंत निर्मूलन, कृत्रिम रेतन व गर्भ तपासणी, वंधत्व तपासणी, आजारी जनावरांवर प्रत्यक्ष उपचार या उपक्रमातून शेकडो जनावरांवर उपचार करण्यात आले असून, शिबिरात स्थानिक पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
शिबिर यशस्वीतेसाठी योगदान डाब पशुवैद्यकीय दवाखानाचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. इंदास वळवी, परिचर नरेंद्र सोनवणे, वाण्याविहीर पशुधन विकास अधिकारी डॉ. जागृत पाटील यांनी शिबिरास तांत्रिक मार्गदर्शन केले.
. या प्रसंगी डॉ. तुषार गीते, प्रभारी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी सांगितले की, “पशुपालकांच्या दरबारी सेवा नेऊन त्यांच्या जनावरांचे आरोग्य सुधारण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. अशा शिबिरांमुळे पशुसंवर्धन व ग्रामीण अर्थव्यवस्थेस बळकटी मिळते.”हा उपक्रम पशुपालनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची नवी दिशा दाखवत आहे.
.
.
.
#पशुसंवर्धन #पशुचिकित्सा #AnimalHealthCamp #Nandurbar #Akkalkuwa #RuralLivelihood #VeterinaryServices #LivestockDevelopment





Post a Comment
0 Comments