सहकार सप्ताह निमित्त मोती बँकतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन
तळोदा :- शहरातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य दि मोती अर्बन कॉ. ऑपरेटिव्ह बँक यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय वर्ष अंतर्गत सहकार सप्ताह निमित्त नेमसुशिल शैक्षणिक समूहात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवला. यावेळी सहाय्यक निबंधक कार्यालय प्रमुख सतिष गावीत सहकार अधिकारी विनोद सामुद्रे, मोती बँक शाखा मॅनेजर वसंतभाई पाटील, प्राचार्य सुनिल परदेशी, बँक कर्मचारी प्रशांत शिंपी, पंकज गुजराथी, अमर पाटील, नितीन भामरे, आदि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र गुरव यांनी केले तर आभार मुकुंदा महाजन यांनी मानले.


Post a Comment
0 Comments