Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोद्याचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


तळोद्याचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष अजयभैय्या परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


तळोदा नगर परिषदचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधत शाळा इमारत भूमिपूजन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रुग्णांना ड्रायफुट वाटप, वृक्षारोपण, बेबिकिट वाटप, बाग लोकार्पण व केक व लाडू तुला अभिष्टचिंतन सोहळा मित्र मंडळ परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे

                     लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष व भाजपाचे नेते अजय भैय्या परदेशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजउपयोगी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. राजकीय सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उपस्थित राहणार आहे.

       तळोदा येथील श्रीमती,प्रमिलाबाई छबुसेठ परदेशी विद्यामंदिरात भूमिपूजन व साहित्य वाटप सकाळी 10 वाजता होणार आहे. 


तळोदा उपजिल्हा रुग्णालयात वृक्षारोपण, ड्रायफुट वाटप, बेबिकीट वाटप होईल.

तळोदा येथील अमरधाम बाग लोकार्पण सकाळी 11 वाजेला होईल.

तळोदा पालिका सफाई कर्मचाऱ्यांना कपडे वाटप सकाळी 11.30 वाजता होणार आहे.

 लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी यांच्या अभिष्टचिंतन सोहळा केक, लाडूतुळा सायंकाळी 7 वाजता करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन आयोजक प्रा. विलास डामरे, योगेश मराठे, जगदीश परदेशी, आमन जोहरी, योगेश गुरव व मित्र परिवाराच्या वतीने केले जात आहे.

Post a Comment

0 Comments