Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फतसामान्य ज्ञान स्पर्धा तीन गटात १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग

 संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फत सामान्य ज्ञान स्पर्धा तीन गटात १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग

               तळोदा :- संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फत शनिवार १९ जुलैला शहरातील माळी समाज मंगल कार्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण तीन गटात १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

            विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. शालेय वयातच सामान्यज्ञानाचा चालू घडामोडी विद्यार्थ्यांना माहीत व्हाव्यात.  विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान  अपडेट ठेवावे. विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमात  सहभागी व्हावे व आपली प्रगती साधावी या हेतूने संत सावता माळी यांची पुण्यतिथी २३ जुलैच्या निमित्ताने शनिवारी १९ जुलै रोजी समस्त माळी समाज पंचाने भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले होते.

             या स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी व इयत्ता अकरावी ते बारावी असे गट करण्यात आले होते. यात पाचवी ते सातवी गटात ६०, आठवी ते दहावी गटात १०० व अकरावी ते बारावी गटात १२ मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला.  माळी समाजाचे अध्यक्ष अनिल माळी ,उपाध्यक्ष विजय शेंडे ,सचिव हिरालाल कर्णकार ,पंच सदस्य ईश्वरलाल मगरे ,रवींद्र मगरे ,सुनील सूर्यवंशी ,राजाराम राणे ,राम सूर्यवंशी ,हेमलाल मगरे ,फुंदीलाल माळी,  सेवानिवृत्त मुख्याध्यापक निमेश सूर्यवंशी ,अजित टवाळे उपस्थित होते.

               स्पर्धेतील तीनही गटांना माळी समाज पंच सदस्य  पंच सदस्य सुनील सूर्यवंशी ,कपिल कर्णकार ,अनिल मगरे ,ईश्वरलाल मगरे, प्रशांत मगरे, किरण राणे ,रवींद्र मगरे ,भिकाजी मगरे ,जगदीश सागर ,अध्यक्ष अनिल मगरे ,उपाध्यक्ष विजय शेंडे ,सचिव हिरालाल कर्णकार यांच्याकडून २३ जुलै रोजी संत सावतामाळी पुण्यतिथी दिवशी पारितोषिके दिली जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुंदीलाल माळी यांनी केले.       

         दुसरीकडे संत सावतामाळी युवा मंच तर्फे संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त उद्या २० ऑगस्ट रोजी सलग अकराव्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर संत सावता महाराजांच्या पुतळा अनावरण देखील आमदार राजेश पाडवी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे उपस्थितिचे आवाहन माळी समाज पंच मंडळाने केले आहे.

Post a Comment

0 Comments