भारतीय जैन संघटनेतर्फे कन्या शाळेतील गुणवंत विद्यार्थिनींच्या गुणगौरव...
तळोदा येथील भारतीय जैन संघटनेतर्फे गुलाबबाई दुर्लभ राजकुळे कन्या विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींच्या गुणगौरव समारंभ संपन्न झाला गुणवंत विद्यार्थिनींना भारतीय जैन संघटनेतर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची शुभारंभ प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलानाने करण्यात आले. स्वागत गीतने प्रमुख अतिथींच्या स्वागत करण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्तविक एडवोकेट अल्पेश जैन यांनी केले त्यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली.
याप्रसंगी प्रा.रमेश मगरे ,अशोक सूर्यवंशी ,निमेश सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करताना गुणवंत विद्यार्थिनीचे कौतुक केले. कीर्ती कुमार शहा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दरवर्षी मराठी विषयात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनीला पारितोषिक देण्याचे जाहीर करून शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासित केले.
यावेळी मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांनी शाळेच्या प्रगतीची वाटचालीची माहिती देऊन उपस्थिताचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली देवरे, भाग्यश्री सागर यांनी केले. कार्यक्रमास योगेश पाटील, दिलीप तडवी, वैशाली देवरे, अनिल इंदिस , दिनेश मराठे, भाग्यश्री सागर, ज्योती महाजन यांचे सह इतर शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments