लोकशाही दिनी ८ तक्रारी निवेदन, संबधित विभागाला निवारण करण्याचा सूचना
नंदुरबार :-
प्रशासन आणि जनतेमधील दुवा मजबूत करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘लोकशाही दिन’ आयोजित केला जातो. यंदाचा लोकशाही दिन दिनांक ०७ जुलै रोजी पार पडला. या दिवशी विविध विभागांकडे नागरिकांकडून आलेल्या एकूण ८ निवेदने प्राप्त झाली.
लोकशाही दिनी महसूल विभाग - ४, जिल्हा परिषद - २,म.रा.वि.मं.- १, व इतर - १ असे आठ निवेदन प्राप्त झाले आहेत.
लोकशाही दिन हा नागरिकांना थेट प्रशासनाशी संवाद साधण्याचा प्रभावी मंच आहे. या माध्यमातून सामान्य जनतेला आपल्या तक्रारी व अडचणींचे निराकरण थेट प्रशासकीय पातळीवर मिळण्याची संधी उपलब्ध होते. तक्रारींचे निराकरण तातडीने व कार्यक्षमतेने करण्यात येते.
या प्राप्त निवेदनांवर संबंधित विभाग प्रमुखांमार्फत कार्यवाही करून, समर्पक वेळेत निकाल लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्या गेल्या आहेत.

Post a Comment
0 Comments