नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा
तळोदा :-
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षास परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून व नाटिकेच्या माध्यमातून गुरूबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त केली. गुरुना पुष्प देऊन व त्यांची पूजा अर्चना करून त्यांचे कृतकृत्य असे उपकार विद्यार्थ्यांनी छेडण्याचा प्रयत्न हा केला.
गुरु द्रोणाचार्य युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव व एकलव्य अशी विद्यार्थ्यांनी विविध भूमिका साकारली व त्यांच्या वक्तव्य हे व्यक्त केले. या उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक पी.डी.शिंपी, उपमुख्याध्यापिका कल्याणी वडाळकर, मनीषा यांचे मार्गदर्शन लाभले संगीता पाटील, माधुरी पाटील, काजल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्तुत्य उपक्रमाचे अध्यक्ष निखिल तूरखीया, उपाध्यक्ष डी.एन. महाले, सचिव संजीव पटेल, संचालिका सोनाबेन तूरखीया व समन्व्य हर्षिल तुरखिया यांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.


Post a Comment
0 Comments