तळोदा मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात आनंददायी शनिवार अंतर्गत रेनी डे साजरा
तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज शनिवार रोजी आनंददायी शनिवार अंतर्गत रेनी डे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजीत नाईक हे होते. या प्रसंगी के. जी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या बोबड्या भाषेत पावसाळी गीत सादर केले, तसेच या बालकलाकारांच्या नृत्याने सर्वांचे मन आकर्षित केले. पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पावसाळी इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतील बडबड गीते सादर केली.
पावसाचे पाणी आपल्या भूतलावावर नवीन जीवनाची सुरुवातीसाठी किती आवश्यक आहे. पाणी हेच जीवन आहे. या पावसात एक झाड लावून त्यांच्या संवर्धन करा. एक पेड माँ के नाम या उपक्रमात प्रत्येकाने सहभागी होऊन रोप लावून सोबत सेल्फी काढावी व दिलेल्या लिंक वर आपला फोटो अपलोड करावा लावलेल्या रूपाचं संवर्धन करावे असे आवाहन सत्यजित नाईक सरांनी केले. आपला देश हा शेतीप्रधान देश असून शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. पावसामुळे नदी नाले वाहतात व आपल्याला पिण्यासाठी मुबलक पाणी असते. जिथे झाडेझुडे तिथे पाऊस पडे. म्हणून प्रत्येकाने झाड लावून त्याच्या संवर्धन करावे असे प्रतिपादन मुख्याध्यापकांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. हंसा किनगावकर तर आभार प्रदर्शन श्रीमती मनीषा मगरे यांनी केले. कार्यक्रमातील सर्व नृत्य नृत्य शिक्षक शरद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Post a Comment
0 Comments