नंदुरबार: जिल्हास्तरीय वनहक्क समितीची अपील दाव्यांवर सुनावणी संपन्न
दि. ८ जुलै २०२५ रोजी बिरसामुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या अपील दाव्यांवर सुनावणी आयोजित करण्यात आली. या सुनावणीत नंदुरबार व नवापूर तालुक्यातील एकूण २६३ वनदावे तपासण्यात आले.
सुनावणीस डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली श्री.संतोष सस्ते (उपवनसंरक्षक, नंदुरबार), श्री. सुहास चव्हाण (उपवनसंरक्षक, तळोदा), तसेच जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे सदस्य उपस्थित होते.
या प्रक्रियेत सहा.प्रकल्प अधिकारी श्रीमती हिप्परगे मॅडम, कनिष्ठ लिपिक अभिमन्यू मोरे, जिल्हा समन्वयक हर्षल सोनार, सहाय्यक रोशन चौरे, रोशनी बहिरम हे कर्मचारी यांच्यासह संबंधित दावेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी वनहक्क कायद्यांतर्गत दावे निकाली काढताना पारदर्शकता व गतीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
.
.
.
#नंदुरबार #वनहक्कसुनावणी #डॉमित्तालीसेठी #ForestRightsAct #AppealHearing #NandurbarDistrict #वनहक्क




Post a Comment
0 Comments