श्रीकाशी विश्वेश्वर मंदिरात शुक्रवारी शिवलिंग, नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील धुळे रस्त्यावरील ज्ञानदीप सोसायटीच्या टेकडीवर असलेल्या श्री काशिनाथ बाबा मंदिरा शेजारील जागेवर मंदिर महादेव मंदिर बांधण्यात आले.
नंदुरबार येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात शिवलिंग आणि नंदी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना शुक्रवार दि.18 जुलै रोजी सकाळी आठ वाजेला होणार आहे. ब्रह्मवृंद आणि पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवतपणे पाच यजमान जोडप्यांच्या उपस्थितीत सोहळा होईल. शिवलिंग आरती आणि दुपारी प्राणप्रतिष्ठापना पूर्णाहुती नंतर प्रसाद वितरण होईल.
55 वर्षांपूर्वी म्हणजे सन 1970 मध्ये धुळे रस्त्यावरील वाघेश्वरी माता मंदिरा शेजारी टेकडीवर श्री काशिनाथ बाबा यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. याच मंदिरा शेजारी यावर्षी नव्याने श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. निसर्गरम्य अशा टेकडीवर श्री काशिनाथ बाबा यांची समाधी, बजरंगबलीची सुरेख मूर्ती, गणपती आणि शिवलिंग,नंदी अशा मूर्ती आहेत. नवसाला पावणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काशिनाथ बाबा मंदिरा जवळील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम एका श्रद्धावान भाविकातर्फे करण्यात आले आहे.
या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री तसेच श्रावण मास महिन्यात भाविकांची वर्दळ असते. कार्तिक वद्य अमावसेला श्री काशिनाथ बाबा मंदिर उत्सवानिमित्त खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धा होत असून राज्यभरातून मल्ल हजेरी लावतात. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या महादेव शिवलिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला परिसरातील भाविकांनी प्रसाद आणि दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री काशिनाथ बाबा मंदिर सेवा समिती व श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.




Post a Comment
0 Comments