मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात संपन्न विविध शैक्षणिक विषयांवर मंथन
तळोदा :- प्रतिनिधी
येथील न्यू हायस्कूलात तळोदा केंद्रातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात पार पडली. या बैठकीत शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर सखोल मंथन करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव होते. त्यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शिक्षकांकडून कार्यक्षमतेने काम करून घेण्याचे आवाहन केले. त्यांनी पुढे सांगितले की, पटसंख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेणे आवश्यक असून, मुख्याध्यापकांनी स्वतःला अद्ययावत ठेवून शाळेविषयी पालकांमध्ये विश्वास निर्माण करावा.
Ai सारख्या डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करणाऱ्या जी डी आर कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांचे यावेळी कौतुक करण्यात आले.कथाकथन व प्रेरणादायी संवादाद्वारे उत्साह निर्माण करून विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचं नातं तयार करावं, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी हेमंत सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सभेस प्रतापपूर केंद्राच्या केंद्रप्रमुख निकुंभे , तळोदे केंद्राचे केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी, न्यू हायस्कूल, तळोदा चे प्राचार्य डॉ. अमरजीत महाजन, आदी मान्यवरांसह तळोदे केंद्रातील प्राथमिक, माध्यमिक व आश्रमशाळांतील अनेक प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांतीलाल पाडवी यांनी केले. तर आभार प्रदर्शन मॅडम यांनी केले.


Post a Comment
0 Comments