Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वाणी समाजातील बहाळ येथे असलेल्या पाच परिवाराचे कुलदैवत आई सारजा बारजा देवीचे मेहुणबारे येथे प्रतिस्थापनेचे नियोजन

 वाणी समाजातील बहाळ येथे असलेल्या पाच परिवाराचे कुलदैवत

आई सारजा बारजा देवीचे मेहुणबारे येथे प्रतिस्थापनेचे नियोजन

.

                      धुळे - वाणी समाजातील सोनजे, नानकर, पाचपुते, खानकरी, ढोमणे या पाच परिवारांचे मुळ कुलदैवत आई श्री सारजा बारजा देवी, बहाळ, ता. चाळीसगांव येथे असून येथे येणार्‍या भाविकांची सोयी-सुविधा व्हावी म्हणून आई कुलस्वामिनी लालाबाई, फुलाबाई या नावाने ट्रस्ट तयार करण्यात आले असून, या ट्रस्टच्या माध्यमातून कुलबांधवांच्या मालकी हक्काच्या मेहुणबारे, ता. चाळीसगांव येथे पहिल्या टप्प्यात साडेपाच एकर क्षेत्रात उद्यान, 50 खोल्यांचे नियोजन व आई सारजा बारजा देवीची नूतन भव्य-दिव्य मंदीर बांधण्याचा निर्णय झाला असून, नामफलकाचे काल अनावरण करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष दिगंबर श्रावण सोनजे यांनी दिली.

         अध्यक्ष दिगंबर सोनजे यांनी पुढे सांगितले की, आमच्या पाचही परिवाराची मुळ दैवत आई कुलस्वामिनी लालाबाई फुलाबाई हे राजस्थानात असून त्या दैवताचे रुप बहाळ, ता. चाळीसगांव येथे आहे. पूर्वी लोकसंख्या कमी होती, त्यामुळे येथे जाणे सुलभ व सोयीचे होते. परंतु आता भाविकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे देवीच्या मंदिराच्या पायरीपर्यंत पोहचणेही अवघड झाले असून, राज्य - परराज्यातून येणार्‍या भाविकांसाठी येथे निवासाची कुठलीही सोयी सुविधा नसल्याने विविध अडीअडचणी येत होत्या म्हणून आई कुलस्वामिनी लालाबाई फुलाबाई या नावाचा पंधरा सदस्य असलेल्या ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून, या ट्रस्टच्या माध्यमातून तेथून जवळच असलेल्या गिरणा नदीकाठी मेहुणबारे येथे भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा व नविन भव्य मंदीर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

                         मेहुणबारे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांतदादा सोंजे होते. फलकाचे अनावरण उद्योजक तात्यासाहेब पंडीत त्र्यंबक नानकर व सौ. विजया पंडीत नानकर यांच्या हस्ते करण्यात आले व कुलस्वामिनी प्रतिमा पुजन कळवण मर्चंट बँकेचे चेअरमन आण्णासाहेब गजानन सोनजे यांच्या हस्ते करण्यात आले. 

                   कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सौ. रेखा खानकरी यांनी केले. ट्रस्टचे अध्यक्ष दिगंबर श्रावण सोनजे यांनी यथायोग्य सविस्तर माहितीसह भविष्यातील नियोजन मांडले व सर्व भक्तांना आर्थिक मदतीचे आवाहन केले. या आवाहनास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. या प्रसंगी ट्रस्टचे संचालक तथा प्रमुख पाहुणे सौ. विजया सोनजे, राजेंद्र वाणी, चाळीसगांव, प्रमोद सोनजे, धुळे, संदीप खानकरी, नामपूर, गौरव सोनजे, दहिवद, प्रशांत सोनजे, नाशिक, विवेक वाणी, नाशिक, भुषण सोनजे, नाशिक, डॉ. संग्राम सोनजे, छ.संभाजी नगर, अनिल सोनजे, नाशिक, राजेंद्र खानकरी, धुळे, डी.जे. नानकर साहेब, ठाणे, चंद्रकांत सोनजे, ठाणे हे व्यासपीठावर उपस्थित होते. 

                          या शुभ प्रसंगी राजेंद्र सोनजे, नाशिक व राजेंद्र पंडीत सोनजे, चाळीसगांव यांनी भावगितांचे गायन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बापूसाहेब राजेंद्र वाणी, सुयश सोनजे, प्रविण सोनजे, अ‍ॅड. नानकर साहेब, प्रमोद सोनजे, गौरव सोनजे, दर्शन सोनजे, प्रविण सोनजे, प्रणव सोनजे, बापू सोनजे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. या स्तुत्य उपक्रमास ट्रस्टला सर्वोतपरी मदत करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. अमोल नानकर साहेब यांनी केले. 

Post a Comment

0 Comments