Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

संत सावता फाउंडेशन व भाजप ओबीसी मोर्चा च्यावतीने संत सावता माळी यांच्या ७३० वी पुण्यतिथी साजरी

  संत सावता फाउंडेशन व भाजप ओबीसी मोर्चा च्यावतीने संत सावता माळी यांच्या ७३० वी पुण्यतिथी साजरी

        तळोदा / सप्त नगरी न्युज            

     तळोदा येथील संत सावता फाउंडेशन व भाजप ओबीसी मोर्चा च्यावतीने संत शिरोमणी सावता माळी यांच्या ७३० वी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात आले.

भाजपा ओबीसी मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष  राहुलभाऊ वासुदेव शेंडे व शहादा तळोदा विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनात प्रमुख उपस्थितीत थोर समाज सुधारक श्री संत शिरोमणी सावता माळीयांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न झाला.

            सर्वप्रथम लक्ष्मण माळी यांच्या हस्ते श्री संत शिरोमणी सावता माळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अंबालाल साठे, शैलेश अहिरे, संजय माळी, लंकेश माळी, योगेश माळी, आशुतोष पटेल, योगेश गुरव व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. श्री संत शिरोमणी सावता माळी*  यांचा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन पर संदेशाचे वाचन कैलास चौधरी यांनी केले. संत शिरोमणी सावता माळी यांच्या कार्याला उजाळा दिला सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments