तळोदा बस स्थानक लगत गटारी अपूर्ण, रस्ता चिखलमय तलाव साचला ; जनतेचे हाल उपाययोजनांची मागणी
या बाबत पालिका मुख्यधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, तळोदा बस स्थानक लगत असलेल्या रस्ता असून या रस्त्यावर रुग्णालये, विविध व्यवसायिक प्रतिष्ठाने तसेंच मोठी वर्दळ असलेला रस्ता असून या परिसरात गटारी काम सुरू होऊन गेल्या तीन महिन्यापूर्वी कंत्रातदाराने पाईप गटाराचे काम अपूर्ण सोडून दिले आहे. तसेच काँक्रीटीकरण काम मंजूर झाले असून काम सुरू झाले नाही. पावसाळा सुरू झाला असल्याने रस्त्यावर चिखलाचे दलदल तसेच तलाव साचला आहे. त्यामुळे चिखलातून व पाण्यातून मार्गक्रम व्हावे लागते त्यामळे व्यवसायिक रहिवासी वन नागरिकांना मार्गक्रम करतांना प्रचंड हाल, मोठी गैरसोय होत आहे.
आपण या रस्त्याची पहाणी करावी त्वरित उपाययोजना करून सुधारणा करावी होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा आंदोलन करण्यास भाग पडून नये. असा इशारा दिला आहे. निवेदनावर राजेश वाणी, विलास गुरव, जितेंद्र गुरव, जितेंद्र जैन, डॉ. विलास वाघ, डॉ. राहुल पटेल, डॉ. सागर पटेल, नितीन शिंदे, मिलिंद माळी, गोविंद पटेल, राहुल मराठे, आशिष जैन डॉ. सुमित वाणी, विजय मेडिकल, खुशाल शर्मा, सिद्धिविनायक मेडिकल, आयुष्य गांधी आदींच्या सह्या आहेत.



Post a Comment
0 Comments