तळोदा तालुक्यात आरोग्य विषयक आढावा बैठक संपन्न तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी यांचे मार्गदर्शन
तळोदा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तळोदा येथे आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व आरोग्य निर्देशांकांचा सविस्तर आढावा घेणारी बैठक पार पडली. या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते उपकेंद्रांपर्यंतची विविध सेवा व कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
आढावा बैठकीतील NSV कॅम्प दि. ५ व ८ ऑगस्ट २०२५ नियोजनाबाबत सूचना केल्यात.
जोखमीच्या गर्भवतींची यादी अद्यावत करणे: जुलै २०२५ अखेरपर्यंतची deu list अंतिम करण्याचे निर्देश दिले. स्वच्छता मोहीम: प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात नियमित स्वच्छता राखण्याचे सक्त आदेश दिले. मानव विकास लाभार्थ्यांची यादी (एप्रिल २०२५ - मार्च २०२६): अद्यावत करण्याचे निर्देश,
मातृ व बाल आरोग्य संबंधित मुद्दे:
१२ आठवड्याच्या आत गर्भवती नोंदणी, संस्थात्मक प्रसूतीसाठी भेटी व नियोजन, नवजात बालकांच्या नोंदणी व दाखल्यांचे व्यवस्थापन, मिशन ८४ अंतर्गत गृहभेटी – मातृ व बाल मृत्यू टाळण्यासाठी जनजागृती, SAM बालक, कमी वजनाची बालके, अति जोखमीच्या माता यांच्याशी थेट संपर्क, NRC / CTC / VCDC मध्ये SAM बालकांचे संदर्भ व दाखल प्रक्रियेवर भर, संपर्कतुटलेल्या भागातील गरोदर व बालकांसाठी विशेष भेटी व योजनाबद्ध काम
सिकलसेल व टीबी संबंधित उपक्रम:
Hydroxyurea उपचार सुरू करण्यासाठी तपासणी व भेटी
नवजात तपासणी (New Born Screening) साठी NBS माहिती
TB मुक्त ग्रामपंचायत – जुलै ते डिसेंबर 2025 पर्यंत व्यापक प्रयत्न
कुष्ठरोग, साथ, कीटकजन्य रोग व अतिसार सर्वेक्षणाबाबत निर्देश
डिजिटल व प्रयोगशाळा व्यवस्थापन:
RCH पोर्टल अपडेट वेळेवर भरणे
E-सूची व S/P/L फॉर्म माहिती व्यवस्थापन
पाणी, मीठ, TCL, रक्त व Sputum नमुन्यांचे नियमित नमुना संकलन
यावेळी सर्व तालुकानिहाय आरोग्य सहाय्यक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य सेविका व THO कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत संपूर्ण तालुका स्तरावरील आरोग्य सेवा अधिक सुदृढ व नागरिकाभिमुख व्हावी यासाठी सखोल चर्चा करण्यात आली. डॉ. वळवी सरांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे मार्गदर्शन करत प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा राबवण्याचे निर्देश दिले.
.


Post a Comment
0 Comments