तळोद्याचे प्राचार्य डॉ. अमरदीप महाजन यांना यूएसए केनडी युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन एज्युकेशनची ऑनररी डॉक्टरेट पदवी प्राप्त
तळोदा :- येथील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल व श्री शि. ल. माळी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन यांना यूएसए येथील केनडी युनिव्हर्सिटी कडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन एज्युकेशनची ऑनररी डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांना अनेक संस्थाच्या वतीने नुकतेच विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
नॅशनल स्कूल अवॉर्ड्स (NSA) यांच्यातर्फे दिला जाणारा मोस्ट क्वालिफाईड प्रिंसिपल ऑफ द इयर २०२५ ऑफ स्टेट महाराष्ट्र हा पुरस्कार नुकताच प्राचार्य डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन यांना प्राप्त झाला आहे. सदर पुरस्काराची दखल घेऊन लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे सर्टिफिकेट देऊन त्यांना गौरवण्यात आले.
तसेच त्यांना नुकताच ग्लोबल बेस्ट प्रिन्सिपल रोल मॉडेल अवॉर्ड - २०२५ प्रदान करण्यात आला आहे. वर्ड ह्युमॅनिटी कमिशन (यूएसए) यांच्या तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार त्यांना व शिक्षिका गौरव पुरस्कार शितल अमरदीप महाजन यांना देण्यात आला आहे. बी द चेंज फाउंडेशन तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. तसेच प्राचार्य डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन यांना राष्ट्रसेवा पुरस्कार २०२५ देऊन गौरवण्यात आले आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई अरुणकुमार महाजन, संस्थेचे आधारस्तंभ तथा कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुणकुमार महाजन, संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
🥇बी द चेंज फाउंडेशन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025
🥈नॅशनल स्कूल अवॉर्ड
🥉ग्लोबल अचिव्हर्स ऑफ इंडिया 2025
🏅MVLA ग्लोबल बेस्ट प्रिन्सिपल रोल मॉडेल अवॉर्ड 2025
🎖️मोस्ट क्वालिफाईड प्रिन्सिपल ऑफ द इयर 2025 ऑफ स्टेट महाराष्ट्र
सदर पुरस्काराची दखल घेऊन लंडन बुक ऑफ व रेकॉर्ड यांच्या मार्फत प्रमाणपत्र देऊन आपणास गौरवण्यात आले.



Post a Comment
0 Comments