Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अक्कलकुवा-अक्राणी मतदार संघात १२ कोटी ४० लाखाचा विकास निधी मंजुरी - आमदार आमश्या पाडवी आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नाला यश ; जि.प.च्या ५४ वर्ग खोल्या, ८ नवीन अंगणवाड्या इमारती व इतर विकास कामांना मंजुरी

अक्कलकुवा-अक्राणी मतदार संघात १२ कोटी ४० लाखाचा विकास निधी मंजुरी - आमदार आमश्या पाडवी 


आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नाला यश ; 

जि.प.च्या ५४ वर्ग खोल्या, ८ नवीन अंगणवाड्या इमारती  व इतर विकास कामांना  मंजुरी

                  अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाच्या रखडलेल्या विकास कामांसाठी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या मागणी आणि पाठपुराव्यामुळे नवीन अंगणवाडी इमारत, शाळा इमारत व इतर कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून सुमारे १२ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजुर झाला असुन सदर कामांना प्रशासकीय मान्यता ही मिळाली असल्याची माहिती आ. आमश्या पाडवी यांनी अक्कलकुवा येथे पत्रकार परिषदेत दिली.

      यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देतांना आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले की अक्कलकुवा आणि धडगाव मतदारसंघात अंगणवाड्या, जिल्हा परिषदेच्या शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती त्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा नवीन वर्ग खोलींच्या प्रतिक्षेत होत्या त्यामुळे सदर शाळांची आणि अंगणवाड्यांच्या नवीन इमारती व्हाव्यात यासाठी आपण नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या निधीं तुन निधी मिळावा यासाठी मागणी करुन सतत पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने पालकमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांनी अक्कलकुवा आणि धडगाव या दोन तालुक्यांसाठी सुमारे १२  कोटी ४० लाख रुपये मंजुर केले आहेत. त्यातून जिल्हा परिषदेच्या ५४ वर्ग खोल्या, ८ नवीन अंगणवाड्या तसेच ५०५४ मधुन कोयलीविहीर, निंबीपाडा,  तोबीकुवा येथे एकुण १ कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आ. आमश्या पाडवी यांनी दिली तसेच अक्कलकुवा तालुक्यासाठी नवीन ५७ तर धडगाव तालुक्यासाठी ७१ असे एकुण १२८ रोहित्र, दोन्ही तालुक्यात ६७ हातपंप, पाणी टंचाई निवारणासाठी अक्कलकुवा तालुक्यात 20 व धडगाव तालुक्यासाठी ३० पाण्याचे टँकर  धडगाव नगरपंचायतीसाठीच्या विविध विकास कामांसाठी 4 कोटी रुपयांची मागणी, ५ ग्रामपंचायतीसाठी सोलर सिस्टम, ५शाळांचे क्रीडांगण समतल, तसेच साठवण बंधारे असे एकुण सुमारे १५ कोटी रुपये खर्चाच्या कामांची मागणी प्रस्तावित असल्याची माहिती ही यावेळी आमदार आमश्या पाडवी  यांनी दिली. अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून येत्या काळात मोठ्या प्रमाणावर दोन्ही तालुक्यात विकास कामे करुन जनतेला प्रवाहात आणण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला प्रा. डॉ.दिनेश खरात, आमदार आमश्या पाडवी यांचे स्विय सहाय्यक रविंद्र गुरव, सुधीरकुमार ब्राम्हणे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments