वावद के. डी. गावीत माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम
नंदुरबार तालुक्यातील वावद येथिल के.डी.गावीत माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी वृक्षदिंडीचे पुजन आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. ऋषिकाताई गावीत यांनी केले. याप्रसंगी लीलाबाई लुळे, वनपाल सोनाली बोरसे, आरती नगराळे, रेखा गिरासे, कैलास ठाकरे, सुदाम पाटील,मीनाताई भिल,दगा जाधव,बन्सीलाल जाधव,भीमसिंग राजपूत, सुनिल भिल, शानाभाऊ भिल उपस्थित होते.
रॅलीत फेटेधारी मुलींचे लेझीम पथक,वारकरी, कळसधारी मुली व वृक्षारोपणाचे संदेश देणारे घोषवाक्ये यांनी गावकऱ्याचे लक्ष वेधून घेतले.विविध घोषणानीं विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचा संदेश दिला.शाळेच्या प्रांगणात मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.ऋषिका गावीत यांनी वृक्षलागवड हि एक दीर्घकालीन पर्यावरणपूरक उपक्रम आहे.झाडे लावणे हे पहिले पाहुल आहे,पण त्याचे संगोपन आपले कर्तव्य आहे. म्हणून या उपक्रम अंतर्गत दर आठवड्याला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झाडांची निगा राखण्याचे आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लागवड करण्याचे मुख्याध्यापक मनोहर साळुंके यांनी सांगितले.





Post a Comment
0 Comments