लाखापुर फॉरेस्ट येथे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन.
वाढती लोकसंख्या या विषयावर निबंध स्पर्धा संपन्न.
तळोदा तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपशिक्षक संजय पाटील यांनी भूषवले. या वेळी उपशिक्षक मंगल पावरा यांनी "लोकसंख्येच्या दुष्परिणामांवर" सखोल आणि माहितीपूर्ण विवेचन केले. तर उपशिक्षक चांदो पाडवी यांनी "लोकसंख्या – एक समस्या" या विषयावर आपले विचार मांडत उपस्थितांना जनजागृती पर भाष्य केले.
अध्यक्षीय भाषणात उपशिक्षक संजय पाटील यांनी , दाखल्यांमधून आणि तुलनात्मक आकडेवारीच्या माध्यमातून लोकसंख्येच्या समस्येवर प्रकाश टाकला. त्यांनी भारतासह इतर देशांची लोकसंख्या तुलना करून या समस्येचे गांभीर्य पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अनिल भामरे यांनी तर आभार प्रदर्शन उपशिक्षक मंगल पावरा यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, उपशिक्षक संजय पाटील, विनोद राणे, मंगल पावरा, चांदो पाडवी, फिरोजअली सय्यद, अनिल भामरे, सुवर्णा कोळी, सागर पाडवी आदींनी परिश्रम घेतले.



Post a Comment
0 Comments