हरिनामाचा गजर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलच्या अंगणी अवतरली पंढरी
तळोदा :- आषाढी एकादशी निमित्त नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला.यावेळी विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेतून प्रत्यक्ष पंढरपूरचे दर्शन घडवले.विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जयघोष करीत संपूर्ण विद्या मंदिरातील वातावरण विठ्ठलमय झाले.
यावेळी विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई, संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई संत जनाबाई संत सोपान देव संत नामदेव संत एकनाथ, संत गोरकुंभार संत पुंडलिक यांची वेशभूषा साकार केली टाळ मृदुंग फुगडी व नृत्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष वारकऱ्यांचे दर्शन घडले यावेळी संस्थेच्या संचालिका सोनाबेन तुरखियां यांनी विठ्ठल रुक्माई च्या मूर्तीची आरती केली व प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या अनोख्या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिल तुरखिया,उपाध्यक्ष डी एम महाले, सचिव संजय पटेल संस्था समन्वय हर्षिल तुरखियां यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले मुख्याध्यापक पी.डी.शिंपी उपमुख्याध्यापिका कल्याणी वडाळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments