तळोदा येथे जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक संपन्न
नंदुरबार जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक तळोदा येथील जिल्हाकनकेश्वर महादेव मंदिरात उत्साहात वातावरणात पार पडले. या बैठकीस महाराष्ट्र प्रांत मंत्री सुभाष महाजन आणि प्रांत कार्यकारिणी सदस्य साहेबराव पवार (बारीपाडा) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, जिल्हा सह मंत्री प्रशांत आहिराव, जिल्हा कोषाध्यक्ष मधुकर माळी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तुकाराम रोजळे, सुपडू दादा ठाकरे, जगदीश शिरसाट बैठकीला विशेष आमंत्रित विजयराव सोनवणे, डॉ. शांतीलाल पिंपळे यांची विशेष उपस्थिती होती.
बैठकीत तळोदा तालुक्यातील 14 गावांमध्ये ग्राम समित्या येत्या 8 दिवसांत स्थापन करणे, 29 ऑगस्ट रोजी भगवान बलराम जयंतीनिमित्त पूजन कार्यक्रमांचे नियोजन, संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे गावपातळीवर नेण्यासाठी दिशादर्शक ठरले आहे. बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भारतीय किसान संघाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
तळोदा तालुक्यातील नऊ गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले, यामध्ये विशेषत:अशोकभाई पाटील (आमलाड), दत्तू अर्जुन पाटील (धानोरा), सोमनाथ साळवे (धानोरा), अतुल भीमसेन पाटील (मोरवड), अरुण सिंग राजपूत (कडेल), अर्जुनभाई पटेल (मोड),
प्रतापसिंग गिरासे (प्रतापपूर), लक्ष्मण राजपूत (प्रतापपूर), नितीन नारायण पाटील (चिनोदा) आदी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments