Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर देशभक्तीपर चित्रफीत दाखवून कारगिल युद्धाची सविस्तर माहिती

कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर देशभक्तीपर चित्रफीत दाखवून कारगिल युद्धाची सविस्तर माहिती

                                




           तळोदा, येथील अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित येथील स्वातंत्र्यसेनानी, प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल व श्री शि. ल. माळी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (ता. २६) कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर देशभक्तीपर चित्रफीत दाखवून त्यांना कारगिल युद्धाची सविस्तर माहिती देण्यात आली.

                           महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरदीप महाजन, इंग्लिश विभाग प्रमुख शितल महाजन, उपमुख्याध्यापक साहेबराव खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील आयटी लॅब मध्ये विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर देशभक्तीपर चित्रफीत दाखविण्यात आली. देशासाठी अतिशय कठीण परिस्थितीत जम्मू आणि काश्मीरच्या भागात झालेल्या युद्धातील जवानांचे त्याग, बलिदान व शौर्य याबद्दलच्या माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. तसेच याप्रसंगी युद्धातील शहीद जवानांना आदरांजली देखील वाहण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक अरुण महाजन, विज्ञान विभाग प्रमुख नितीन शिंपी, कला विभाग प्रमुख संदीप मगरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments