Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

श्री विठ्ठल मंदिर देवस्थान च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त महाआरती व राजा पंढरीचा या भक्ती गित कार्यक्रम

 श्री विठ्ठल मंदिर देवस्थान च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त महाआरती व राजा पंढरीचा या भक्ती गित कार्यक्रम

                   तळोदा शहरातील बालाजी वाडा येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर देवस्थान च्या वतीने महाआरती चे आयोजन सालाबादप्रमाणे करण्यात आले होते,या प्रसंगी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते पांडुरंगाची आरती करण्यात आली, या प्रसंगी मोती बैंकेचे चेअरमन निखिल भाई तुरखिया, आमदार प्रतिनिधी किरण सुर्यवंशी,  शिरीषकुमार माळी,  ॲड. संजय पुराणिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, 

यावेळी विठ्ठल मंदिर देवस्थान च्या वतीने सर्व मान्यवरांचे, अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम वडाळकर, आशुतोष वडाळकर,चि. मिहिर वडाळकर यांनी स्वागत केले,या वेळी तळोदा शहरातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.

          या आषाढी एकादशी निमित्त राजा पंढरीचा या भक्ती गित मैफली चा आनंद श्रोत्यांना लाभला,रात्री गोपाळ कृष्ण संगीत विद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, रंग भक्ती चा राजा पंढरीचा हा कार्यक्रम दरवर्षी विद्यालयाच्या संचालिका सौ. कल्याणी वडाळकर व त्यांच्या सर्व विद्यार्थीनी यांनी घडवून आणला. यात भक्ती गित, अभंगवाणी, गवळण, भारूड, जोगवा ई. कार्यक्रमांची रेलचेल होती. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा हा कार्यक्रम म्हणजे अवर्णनीय आनंद होता, अतिशय सुरेल अश्या भक्ती रसाने भरलेल्या कार्यक्रमात नंदिनी कलाल,मोक्षदा पाटील,दिक्षा सुर्यवंशी,प्रांजल कलाल, तनिष्का कलाल,प्रियांशी माळी, वैदेही गुरव, राशी परदेशी, एकता वंजारी, समिक्षा पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना  सोना भाभी तुरखिया आणि  पुष्पा बागुल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली, या भक्ती रसाने न्हाऊन निघालेल्या मैफलीत तबलावादन हर्षल कलाल, हार्मोनियम साथ संचालिका सौ कल्याणी वडाळकर,टाळवादन दर्शन शिंपी यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा सोनार हिने केले तर आभार प्रदर्शन सौ कल्याणी वडाळकर यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी भुषण पवार, सचिन पाटील , सृष्टी गांधी, पंकज कलाल, महेंद्र गुरव,  मिहिर वडाळकर आणि नुपूर वडाळकर यांनी कठोर परिश्रम घेतले. नेमसुशिल परिवाराचे विशेष आभार.

Post a Comment

0 Comments