साक्री नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुक निरीक्षक म्हणून डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती
तळोदा : साक्री जि. धुळे नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुकी निरीक्षक म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे.
याबाबत धुळे भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण (बापू) खलाणे, साक्री नगरपंचायतीचे गटनेते बापू गिते यांनी नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका पत्राद्वारे सूचित केले आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारभाऊ रावल, जेष्ठ नेते आमदार अमरीशभाई पटेल, जिल्हाध्यक्ष रामकृष्ण (बापू) खलाणे यांचे उपस्थितीत धुळे येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते निरीक्षक म्हणून डॉ शशिकांत वाणी यांची निवड करण्यात आली.साक्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुक आज 29 जुलै 2025 रोजी पार पडणार असून स्विकृत नगरसेवक पदासाठी निवडणुक दि.30 जुलै रोजी 11 वाजता संपन्न होत आहे. हि निवडणूक शासकीय विश्रामगृह साक्री येथे पार पडणार आहे.

Post a Comment
0 Comments