नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा साजरी
तळोदा :- शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरात गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यामंदिराच्या मुख्या. श्रीमती पुष्पा बागुल व गणेश बेलेकर हे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता पूर्वक गुरूंचे वंदन करून औक्षण केले
प्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला विद्यामंदिरातील शिक्षक संदिप चौधरी, देवेंद्र शिंपी, अरुण कुवर, चंद्रकांत भोई, कमलेश पाटील, सागर मराठे, सचिन पाटील, सुदाम मुजगे, प्रतिभा गुरव, रुख्मिणी खर्डे, अश्विनी भोपे, योगिता सोनवणे, राजेश मराठे, अंकित डोंगरे, शैलेंद्र पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनस्वी कुवर या विद्यार्थिनीने केले. तर आभार लावण्या मराठे या विद्यार्थिनीने मानले.

Post a Comment
0 Comments