नवागाव जि. प. शाळेत आषाढी एकादशी निमित्त शालेय दिंडी व पालखी, रिंगण सोहळाने वेधले लक्ष
यावेळी शिक्षकांनी मिळून टाकावू वस्तूंपासून टिकावू अशी विठुरायाची पालखी तयार केली. कार्यक्रमारिता शाळेतील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली होती.
यावेळी पालखी मधे विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती, फोटो व पादुकांची पूजा करण्यात आली. आरती प्रसाद वाटण्यात आला. तसेच टाळ मृदंगाच्या गजरात गावभर पालखी व दिंडी काढण्यात आली.
दिंडीत झाड आईच्या नावाचे, एकच ध्यास गुणवत्ता विकास तसेच स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण याविषयी भित्तीपत्रके सादर करण्यात आली. दिंडी गावाचे ग्रामदैवत हनुमान मंदिरात नेऊन तिथे पूजा करण्यात आली.
यावेळी विद्यार्थी पालक व संपूर्ण गावामध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आहे.दिंडी मध्ये विठ्ठलाच्या नामघोषात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी फुगडी खेळत आनंद लुटला. रिंगण सोहळा पार पडला. शेवटी शालेय परिसरात पुन्हा आरती पूजा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वसईकर यांनी मार्गदर्शन केले. उपक्रमशील शिक्षक अर्जुन सोनवणे यांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्य करत टाळ मृदंगाच्या गजरात गावभर भजन सादरीकरण केले. सुनील पावरा यांनी फलक लेखन, भित्तीपत्रके तयार केली.
शिक्षिका विजयालक्ष्मी पाडवी व वनश्री पावरा यांनी पालखी तयार करणे, सजावट, विद्यार्थ्यांची वेशभूषा, मेकअप साठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या तांत्रिक बाबी शिक्षक अभय सराफ यांनी पूर्ण केल्या. ध्वनी चित्रण व छायाचित्रण गावातील फोटो ग्राफर नवनाथ पाडवी यांनी केले.





Post a Comment
0 Comments