प्रतिपंढरपूर रांझणी येथे भक्तांची मांदियाळी, विठू माऊली गजरात भाविकांनी घेतले दर्शन
तळोदा तालुक्यातील प्रतीपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या रांझणी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती. गेल्या 15 दिवसापासून सतत पाऊस सुरू होता. परंतु दिनांक 6 रोजी एकादशीला सकाळी पाऊस थांबला असल्याने सकाळपासूनच भाविकांनी विठ्ठल रुखमाई चे दर्शनासाठी रांग लावली होती. पहाटे पाच वाजता काकडा आरती, सकाळी 7 वाजता प्राध्यापक निलेश जाधव व हिमाद्री जाधव यांच्या हस्ते महापूजा करण्यात येऊन श्रीहरीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यासाठी आत्माराम भजनी मंडळ, शिवानंद भजनी मंडळ, संत गुलाम बाबा भजनी मंडळ यांनी मेहनत घेतली.
परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिवसभरातून दर्शन घेतले.जवळपास 50000 भाविकांनी दर्शन घेतले.
भाविकांसाठी विठ्ठल रुक्माई सेवा समितीकडून फराळाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच सारथी फाउंडेशन तळोदा यांच्याकडून राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले.
आषाढीनिमित्त मोड, मोहिदा,सदगव्हाण प्रतापपूर,चिनोदा,रोझवा, पाडळपूरसह गावातून भाविक पायी दर्शनासाठी आले तसेच दिंडीही आल्या.
भाविकांसाठी प्रथमोपचारासाठी प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी यांनी आरोग्य सेवा दीली.
यात्रोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल रुक्माई सेवा समिती, ग्रामपंचायत रांझणी, ग्रामस्थ रांझणी येथील स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.

Post a Comment
0 Comments