आपातकालीन सेवेसाठी नवीन रुग्णवाहिकेची मागणी
बिरसा आर्मीचे जिल्हा शल्यचिकित्सक अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,पालकमंत्र्यांना निवेदन
तळोदा :जिल्ह्यात आपातकालीन १०८ क्रमांकाच्या नवीन रुग्णवाहिकेची अंत्यत आवश्यकता असल्याने बिरसा आर्मीने जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी नंदुरबार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन पाठवले.
याबाबत निवेदन म्हटले आहे की,दि.१२ जुलै २०२५ रोजी खांडबारा -खैरवे ता.नवापूर रस्त्यावर अपघात झाला.परंतु, रुग्णवाहिका त्रुटीमुळे दोन तास उलटूनही तातडीच्या सेवेसाठी कार्यरत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका वेळेवर पोहचू शकली नाही. जुन्या रुग्णवाहिकेमुळे वारंवार तांत्रिक बिघाड व देखभालीचा अभावाने रस्त्यातच बंद पडतात. जिल्ह्यात अनेकवेळा गंभीर परिस्थिती निर्माण होऊन रुग्णाचा जीव धोक्यात आलेला आहे. यासाठी गांभीर्याने लक्ष घालून तातडीच्या सेवेसाठी अक्कलकुवा, मोलगी, धडगाव परिसरातील दुर्गम व लांबचा भागासाठी 'ऍडव्हान्सड लाईफ सपोर्ट'(ए.एल.एस.)१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सहा तर जिल्ह्यातील इतर भागात 'बेसिक लाईफ सपोर्ट' (बी.एल.एस) तीस रुग्णवाहिका अशा एकूण छत्तीस रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.निवेदनावर बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,तळोदा संघटक कालुसिंग पावरा,जितेंद्र बागुल,रुपसिंग पावरा आदी.पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
'जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका पुरेशा नाही.तसेच,जुनाट,तांत्रिक बिघाड असल्याने रस्त्यातच बंद पडतात.अनेकवेळा गंभीर परिस्थिती निर्माण होऊन रुग्णाचा जीवही धोक्यात आला आहे.यासाठी सरकारने तातडीचा सेवेसाठी नवीन छत्तीस रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे'
राजेंद्र पाडवी, संस्थापक अध्यक्ष बिरसा आर्मी.

Post a Comment
0 Comments