Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केलखाडी नदीवर १५ मीटर लांबीचा साकव बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला

 केलखाडी नदीवर १५ मीटर लांबीचा साकव बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला 

अक्कलकुवा तालुक्यातील ठाण्याविहिर पाडा ते केलखाडी पाडा  दरम्यान केलखाडी नदीवर १५ मीटर लांबीचा साकव बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाण्यासाठी सुरक्षित व कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध होणार आहे.

हा अवर्गीकृत रस्ता ठाण्याविहिर पाडा ते केलखाडी पाड्यापर्यंत ५ कि.मी.चा आहे. पाड्यापासून १ कि.मी. अंतरावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी दररोज नदी ओलांडून शिक्षणासाठी जातात. पावसाळ्यात नदीला पूर येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता, परिणामी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहत होता. 

साकवामुळे शाळेला जाण्यास सुरक्षित व सहज मार्ग उपलब्ध होणार असून पालकांनाही दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांसह सामान्य ग्रामस्थांसाठीही #साकव अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शिक्षण, आरोग्य सेवा आणि दळणवळणाच्या दृष्टीने यामुळे मोठा बदल घडेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.

#नंदुरबार 

#केलखाडी

Post a Comment

0 Comments