Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

हरित महाराष्ट्राचा उमरकुवा येथून भव्य शुभारंभ ; नंदुरबार जिल्ह्यात दहा कोटी वृक्ष लागवड अभियानास प्रारंभ

 हरित महाराष्ट्राचा उमरकुवा येथून भव्य शुभारंभ ; नंदुरबार जिल्ह्यात दहा कोटी  वृक्ष लागवड अभियानास प्रारंभ                  

अक्कलकुवा :-

 नंदुरबार जिल्ह्याचा "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत हरित महाराष्ट्राचा शुभारंभ अक्कलकुवा तालुक्यातील उमरकुवा येथून  विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर यांच्या हस्ते  वृक्ष लागवड करून करण्यात आला. यावेळी सहाय्यक  वनसंरक्षक अमोल चव्हाण   अक्कलकुवा वनक्षेत्रपाल व्ही.आर .गावित शहादा वनक्षेत्रपाल रामकृष्ण लामगे सरपंच बेबीबाई राजेंद्र वसावे प्रमुख उपस्थितीत होते .  


            सामाजिक  वनीकरण विभागाकडून "हरित महाराष्ट्र -समृद्ध महाराष्ट्र" हे   महत्त्वाकांक्षी  अभियान राबविण्यात येत असून नंदुरबार जिल्ह्यात  दहा कोटी वृक्ष लागवड योजनेचा भव्य शुभारंभ अक्कलकुवा तालुक्यातील उमरकुवा येथून  सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून करण्यात आला.  या अभियानांतर्गत उमरकवा गावातील गावठाण क्षेत्रामध्ये नऊ हेक्टर क्षेत्रावर बांबू व सिताफळ  या प्रजातींची ५६०० रोपांची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यामुळे परिसराचे हरितिकरण होऊन स्थानिक ग्रामस्थांना पर्यावरण पूरक उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील .  यावेळी उमरकुवा   येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर यांनी  मार्गदर्शन करताना शाश्वत हरीतीकरणाचे प्रभावी उपाय सांगत  बीज गोळा करण्याचे( सीड बॉल) तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले . बीज गोळा करणे अर्थात सीडबॉल ही एक सेंद्रिय बियांची गोळी असते जी नैसर्गिक खत ,माती व स्थानिक बियांनी बनवलेली असते पावसाळ्यात ही गोळी जमिनीवर फेकल्यास ती आपोआप  उगवते आणि नवे रोप तयार करते . या तंत्राने दुर्गम किंवा मोकळ्या जागेमध्ये सहजपणे वृक्ष लागवड करता येते हे सीड बॉल तयार  करून गावाच्या आजूबाजूला टेकड्यांवर मोकळ्या  जागांवर आणि नाल्यांच्या कडेला फेकण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. या सीड बॉल मधून उगवणाऱ्या रोपांची            नोंद ' एक पेड, मां के नाम' या योजनेअंतर्गत करण्यात यावी असेही  आवाहन केले. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच लोकसभागातून शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल ठरतो आहे. हरित महाराष्ट्र निर्मितीसाठी नंदुरबार जिल्हा सक्रिय योगदान देत असल्याचेही विभागीय वन अधिकारी गुजर यांनी यावेळी सांगितले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments