Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती व संत सावता माळी पुण्यतिथी साजरी

तळोदा कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती व संत सावता माळी पुण्यतिथी साजरी


तळोदा येथील आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक जयंती व संत सावता माळी पुण्यतिथी ही सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करून उत्साहात साजरा करण्यात आली.

                   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वरिष्ठ प्रा. उषा पावरा होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य के. आर.पदमर यांनी केले. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा. पी .आर. वसावे  यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एस.डी. गिरासे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.आर .एच. पिंपरे, प्रा. एस .के. तडवी, प्रा. एच. के., चौधरी, प्रा. सी .के .ठाकरे, प्रा .एन. आर .मगरे, प्रा. जे.जी. मगरे, प्रा .एस .एच. टवाळे, प्रा. के .एस .चव्हाण, प्रा .आर .आर. माळी ,प्रा .डी. आर .मराठे , प्रा. ए .आर .वळवी  , प्रा .पी .एस. जैन उपस्थित होते. 

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. पी .मगरे व आभार प्रदर्शन प्रा. एस. ए .यशोद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृद यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments