रांझणीत कौशल्य भारत केंद्रात डाळ-मिल कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
उपक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ८० हून अधिक शेतकरी सहभागी
तळोदा / सप्त नगरी न्युज
शेतीपूरक व्यवसायांमध्ये नवउद्योजकतेस चालना देण्यासाठी रांझणी येथील कौशल्य भारत केंद्रात श्री साईनाथ शिक्षण संस्था व नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डाळ-मिल प्रक्रिया उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ८० हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून हेगडेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथील शास्त्रज्ञ डॉ.आरती देशमुख यांनी उपस्थित राहून डाळ-मिल प्रक्रिया व इतर शेती पूरक उद्योगांबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी डाळ निर्मितीतील विविध प्रक्रिया, यंत्रसामग्री वापर, आर्थिक नियोजन व उत्पादकता वाढवण्याच्या तंत्रांवर प्रकाश टाकला. या मार्गदर्शनानंतर डाळ कशी तयार होते याचे प्रात्यक्षिक देखील शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. दरम्यान, या कार्यशाळेत अन्य शेतीपूरक प्रक्रिया उद्योग व योजनांची माहिती देखील देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश वळवी,माजी पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, सामाजिक कार्यकर्ते रतिलाल पावरा, ग्रामपंचायत सरपंच अजय ठाकरे,
सिलिंगपूर सरपंचचे रायसिंग मोरे, श्री. साईनाथ शिक्षण संस्थेचे सचिव गुलाबराव चव्हाण,उद्योजक प्रविण पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून शेतकऱ्यांचे कौतुक केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे भूषण येवले, जागृत तवाडे, महेश सैंदाणे, धनंजय मराठे, मुख्याध्यापक भाऊसाहेब कुवर, महेश वायकर, पन्नालाल पावरा, राकेश पाटील, भीमराव महाले यांचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन हंसराज महाले यांनी सुरेखपणे पार पाडले.
या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये शेती पूरक उद्योगांच्या नव्या संधींबाबत जागरूकता निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे, अशी सकारात्मक प्रतिक्रिया उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.


Post a Comment
0 Comments