Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राज्यातील अंशतः अनुदानित शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी मागणीमध्ये अर्थिक तरतुद न झाल्याने राज्यातील शाळा बंदचा इशारा शिक्षक समन्वय संघ नंदुरबार जिल्हा तर्फे निवेदन

 राज्यातील अंशतः अनुदानित शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी मागणीमध्ये अर्थिक तरतुद न झाल्याने राज्यातील शाळा बंदचा इशारा 

शिक्षक समन्वय संघ नंदुरबार जिल्हा तर्फे निवेदन

तळोदा :--

 राज्यातील अंशतः अनुदानित शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी मागणीमध्ये अर्थिक तरतुद न झाल्याने दि. 08 व 09 जुलै 2025 रोजी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद असणे बाबत चे निवेदन प्राथमिक, माध्यमिक व उच्चं माध्यमिक शिक्षक समन्वय संघ नंदुरबार जिल्हा तर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक व  शिक्षणाधिकारी प्राथमिक नंदुरबार यांना देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व अंशत अनुदानित शिक्षक बांधव व भगिनी यांनी आझाद मैदान मुंबई येथे सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटने तर्फे करण्यात आले आहे.

             या बाबत निवेदनत म्हटले आहे की, दि.05 जुन 2025 पासुन शिक्षण संमन्वय संघावतीने आझाद मैदान, मुंबई येथे अंशतः अनुदानित शाळांचे आंदोलन सुरु आहे. दि. 14 ऑक्टो. 2024 च्या शासननिर्णयाद्वारे शासनाने राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना 01 जून 2024 पासून वाढीव टप्पा अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर झालेल्या मागील हिवाळी अधिवेशनात याबाबत तरतूद करण्यात आली नाही. त्यानंतर झालेल्या भागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पावसाळी अधिवेशनामध्ये या शाळांच्या निधीसाठी आर्थिक तरतुद करण्यात येईल असा शब्द शासनाकडून देण्यात आला होता.


 मात्र आता दि. 30 जून 2025 पासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये या शाळांच्या निधीसाठी आर्थिक तरतुद करण्यात आलेली नाही.


शासनाने वेळावेळी आश्वासन देवूनही निधी देण्यास टाळाटाळ करित असल्याने अंशतः अनुदानित शिक्षक-शिक्षकेतरांमध्ये फसवणुक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यभरात अंशतः अनुदानित शिक्षक-शिक्षकेतर बाधवांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. याचा निषेध म्हणुन दि. 08 व 09 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून निषेध नोंदविला जाणार आहे. या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. याबाबत आपणास अवगत करित असून कृपया आपण आपल्यास्तरावरून आमच्या भावना शासनापर्यंत पोहचवाव्यात, ही नम्र विनंती. निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी व शिक्षकांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments