खलाणे ज्यु. कॉलेजच्या पर्यवेक्षकपदी प्रा. सौ. वंदना नितीन अढावे यांची नियुक्ती
धुळे- श्री. तु. ता. खलाणे महाजन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, देवपूर येथील उपक्रमशिल प्राध्यापिका सौ. वंदना नितीन अढावे यांची नुकतीच कॉलेजच्या पर्यवेक्षक पदी नियुक्ती झाली असून त्यांनी आपला कार्यभार सांभाळला. त्यांच्या या सुनियुक्तीबद्दल शैक्षणिक स्तरातून त्यांचे स्वागत होत असून संस्थेतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रा. वंदना अढावे या ज्येष्ठ समाजसेवक कै. नानासाहेब भटू अढावे यांच्या सून व करणखेडे ता. अमळनेर येथील कै. एकनाथ तुकाराम बोरसे यांची कन्या आहे. त्यांचे पती नितीन भटू अढावे हे उन्नती शाळेत मुख्याध्यापक असून संपूर्ण अढावे परिवार शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तव्यतत्परतेने नावलौकिक मिळवून आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments