Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

द्वारकाधीश संस्थानतर्फे रविवारी मंदिरात आषाढी एकादशी महोत्सव

 द्वारकाधीश संस्थानतर्फे रविवारी 

मंदिरात आषाढी एकादशी महोत्सव 

           नंदुरबार (प्रतिनिधी) सुमारे 200 वर्षांपूर्वी  शहरातील हाट दरवाजा परिसरात परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराजांनी  स्थापित केलेल्या श्री द्वारकाधीश मंदिर संस्थानतर्फे रविवार दि. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 रविवार 6 जुलै रोजी सकाळी सहा वाजता काकड आरती होईल. त्यानंतर साडेसहा वाजेला महाभिषेक आणि मंगला आरती होईल. सकाळी 9 ते 12 दरम्यान श्रीराम भजनी मंडळातर्फे भजन कीर्तन होईल. दुपारी चार वाजेपासून फराळ महाप्रसादाचे वितरण होईल. सायंकाळी सात ते अकरा दरम्यान धन धन सद्गुरु भजनी मंडळातर्फे भजन कीर्तन होईल. आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त श्री द्वारकाधीश मंदिराच्या आतील गाभाऱ्यात  आणि बाहेरून आकर्षक विद्युत रोशनाई फुलमाळांनी सजावट करण्यात आली आहे . भाविकांनी दर्शन महाप्रसादासह महाअभिषेक आणि विविध धार्मिक उपक्रम, आषाढी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री द्वारकाधीश मंदिर संस्थान ट्रस्टीतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments