Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

लोय येथे पिंपळोद केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

 लोय येथे पिंपळोद केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

                  नंदुरबार तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा लोय येथे पिंपळोद केंद्रातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. 

                             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोय गावाच्या सरपंच श्रीमती सरिताबाई वळवी ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सुंदरदे बीटचे  शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. सचिन गोसावी, पिंपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच व प्रमुख मार्गदर्शक यांच्या हस्ते सरस्वती पूजन , दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी शासकीय लोय आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी  ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले . त्यानंतर  पिंपळोद केंद्रातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेला उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथींचे व  जि.प. मराठी शाळा, व खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांचे सत्कार शासकीय  लोय आश्रम शाळेचे प्राचार्य अजय भदाणे यांनी केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपळोद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक आसिफ शेख यांनी केले.

    सन 2025-26 शैक्षणिक वर्षातील  पिंपळोद केंद्रातील ही पहिलीच केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन शासकीय लोय आश्रम शाळेत करण्यात आले होते. यावेळी  केंद्रप्रमुख हिरामण वाघ यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना नवीन शैक्षणिक वर्षातील होणारे शैक्षणिक विविध बदल, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न यासाठी शासनाचे विविध परिपत्रक याविषयी सविस्तर माहिती  दिली. तर अध्ययन निष्पत्ती वर आधारित आदर्श पाठ लोय आश्रम शाळेचे शिक्षक जितेंद्र गाडेलोहार यांनी इयत्ता ३ री विषय मराठी  वासाची किंमत या पाठाचे  सादरीकरण केले. तर वेळावद जि .प .मराठी शाळेचे शिक्षक संदीप पाटील यांनी परख (PARAKH) 2025 नंदुरबार जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती यावर सविस्तर अशी माहिती दिली.  शिक्षक अरविंद गावित यांनी शासन स्तरावर विविध समित्यांचे एकत्रीकरणाचे शासन निर्णय याविषयी सविस्तर माहिती दिली. गटकार्यात निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अंतर्गत माझा वर्ग माझे नियोजन याविषयी शिक्षक बालाजी लातोंडे सर यांनी सविस्तर अशी माहिती दिली तर  शेजवा येथील शिक्षक मनोज चौधरी यांनी माझा वर्ग व माझे नियोजन याविषयी सविस्तर अशी माहिती दिली, सदरील केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत सुंदरदेबीटचे विस्तार अधिकारी डॉ. सचिन गोसावी यांनीही जि प शाळेच्या शिक्षकांना अनमोल असे मार्गदर्शन केले. सदरील पिंपळोद केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेला पिंपळोद केंद्रात येणाऱ्या जि. प. मराठी शाळा ,खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शासकीय लोय आश्रम शाळेचे शिक्षक भरत चौधरी यांनी केले. तर आभार  शिक्षक डी .एम. बुवा यांनी मानले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments