शासकीय महसुल वसुलीचा आढावा व विभागीय कार्यालयांना सूचना अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांची तळोदा तहसील कार्यालयास भेट
तळोदा | दि. 17 जुलै तळोदा येथील तहसील कार्यालयास अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी आज भेट देऊन विविध शासकीय कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी महसूल वसुली, ई-सेवा प्रणालींची अंमलबजावणी, पुनर्वसन गावातील सातबारा वितरण, व कार्यालयीन स्वच्छता आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा व पाहणी केली.
शासकीय महसूल वसुलीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत गौणखनिज स्वामित्वधन वसुलीचा विशेषत: अभ्यास करण्यात आला.
बैठकीत गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी न.पा., उपअभियंते सा. बांधकाम, पंतप्रधान ग्रामसडक योजना, नंदूरबार मध्यम प्रकल्प व जिल्हा परिषद बांधकाम विभाग, तसेच भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक उपस्थित होते.
तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीत खालील बाबींवर विशेष चर्चा झाली शासकीय महसूल वसुलीची सद्यस्थिती, ई-फेरफार, ई-चावडी, ई-हक्क, जिवंत सातबारा यांसारख्या ई-सेवांचे नियमित अद्ययावतीकरण व अंमलबजावणी, सर्वेक्षण समिती पुनर्वसन (स. स. प्र.) अंतर्गत पुनर्वसन गावात 7/12 वितरणाची सद्यस्थिती, स. स. प्र. अंतर्गत शिल्लक जमिनीचे सर्वेक्षण व नोंदणीची गरज
कार्यालयीन पाहणी व स्वच्छतेच्या सूचना देण्यात आल्यात. यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांना भेटी देऊन आवाराची व कार्यालयीन स्वच्छतेची पाहणी केली आणि संबंधितांना आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रातिनिधिक स्वरूपात संकलन दप्तरींची पाहणी करून कामकाजाच्या अचूकतेचा आढावा घेतला.
या दौऱ्याद्वारे महसूल प्रशासनातील कामकाज अधिक गतीमान व कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा आणि सूचना देण्यात आल्या.
.
.
.
#महसुलीवसुली #तळोदा #अपरजिल्हाधिकारीभेट #ईसेवा #सरकारीकार्यालयआढावा #nandurbaradministration #revenuereview

Post a Comment
0 Comments