शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी काढत केली जनजागृती
नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात ढोल ताशांच्या व लेझीम खेळून वृक्ष दिंडी काढत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील हे होते. उद्घाटन पिंपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघयांच्या हस्ते झाले. तर प्रमुख अतिथी म्हणून शेजवा गावाचे पोलीस पाटील योगेश वसावे, शेजवा ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच मुन्ना वसावे ,मा. सरपंच विजयसिंग वसावे आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षदिंडी रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.
सजवलेल्या पालखीतून वृक्ष दिंडी ढोल ताशांच्या गजरात व लेझीम पथकाच्या साह्याने शेजवा गावातून फिरून शिवपुर गावामध्ये नेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये विविध घोषवाक्याचे फलक देण्यात आले होते .त्यात जेथे झाडे जास्त तेथे पाऊस मस्त ,एक झाड मा के नाम, माकड करे हुप हुप झाडे लावा खूप खूप, एक झाड एक श्वास, झाडे लावा झाडे जगवा, वृक्ष म्हणे माणसाला नको तोडू आम्हाला, अशा विविध घोषणा विद्यार्थ्यांनी देऊन संपूर्ण परिसर दुमदुमन टाकला होता . सदरील वृक्ष दिंडीमध्ये विद्यार्थिनींनी सावारी व पारंपरिक आदिवासी पेराव केला होता तर विद्यार्थ्यांनी डोक्यात पांढरे टोपी घातल्या होत्या.
यावेळी शाळेच्या परिसरात इको क्लबच्या माध्यमातून पिंपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ , शाळेचे मुख्याध्यापक डी .एस. पाटील, यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. उपशिक्षक विजय पवार, दीपक वळवी, रामानंद बागले, हारून खा शिखलीकर , संजय बोरसे, आनंदराव पवार संदीप गायकवाड ,श्रीमती संगीता गोखले, लिपिक नेहा शर्मा यादी उपस्थित होते. त्यानंतर शाळेच्या परिसरात मुख्याध्यापक डी एस पाटील पोलीस पाटील योगेश वसावे, उपसरपंच मुन्ना वसावे ,माजी सरपंच विजयसिंग वसावे व शिक्षक यांच्यासोबत इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 वी पर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपणानंतर विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुख्याध्यापक पाटील यांनी वृक्ष वल्ली आम्हा सोयरी... याविषयी व वृक्ष लावण्याचे फायदे वृक्ष संवर्धना याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. सदरील कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक विजय पवार यांनी केले तर सुत्रसंचलन कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले व आभार संजय बोरसे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई संजय वसावे, दिनेश पवार, समीर वसावे, यादीने परिश्रम घेतले.




Post a Comment
0 Comments